GRAMIN SEARCH BANNER

चहा पिताना तोल जाऊन पडल्याने मनोरुग्ण महिलेचा मृत्यू, मुरुगवाडा येथील घटना

रत्नागिरी : शहरातील मुरुगवाडा येथे गेल्या अनेक वर्षांपासून मानसिक आजारी असलेल्या एका 55 वर्षीय महिलेचा चहा पिताना अचानक तोल जाऊन पडल्याने मृत्यू झाला. मनीषा यशवंत भोळे (55, रा. मुस्त्रगवाडा, ता. जि. रत्नागिरी) असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना 8 जुलै 2025 रोजी सायंकाळी 7.20 वाजण्याच्या दरम्यान घडली. मृत महिला 1991 सालापासून मानसिक रुग्ण म्हणून आजारी होत्या आणि त्यांच्यावर मिरज तसेच डॉ. पेवेकर व सिव्हिल हॉस्पिटल रत्नागिरी येथील डॉ. तोडणकर यांच्याकडे उपचार चालू होते. घटनेच्या दिवशी त्या घरी चहा पित असताना अचानक तोल जाऊन पडल्याने बेशुद्ध झाल्या. त्यांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल रत्नागिरी येथे दाखल केले असता, तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश नागरगोजे यांनी तपासणी करून मृत घोषित केले. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Total Visitor Counter

2475718
Share This Article