रत्नागिरी : तालुक्यातील जयगड येथे भाड्याच्या खोलीत असलेल्या एका 21 वर्षीय तरुणाने टॉवेलने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हीरसिंग मसरसिंग रजपूत (21, मूळ रा. राजस्थान, सध्या रा. वाटद खंडाळा, ता. जि. रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. 8 जुलै 2025 रोजी सायंकाळी 6.45 वाजता ही घटना उघडकीस आली.
हीरसिंग याचा मामा सायंकाळी 6.45 वाजता भाड्याने राहत असलेल्या रूमवर गेला असता, रूमचा दरवाजा उघडला नाही. दरवाजा जोरात उघडल्यानंतर मयत बेडरूममधील सीलिंग फॅनला टॉवेलने गळफास घेऊन लटकलेल्या स्थितीत दिसला. मामाने त्याला खाली उतरवून प्राथमिक आरोग्य केंद्र, वाटद खंडाळा येथे उपचारासाठी आणले असता, तेथील डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले. याप्रकरणी जयगड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जयगडमध्ये 21 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
