GRAMIN SEARCH BANNER

चिपळूणमध्ये उभ्या टेम्पो ट्रॅव्हलरला इर्टिगाची जोरदार धडक; मुंबईतील चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

Gramin Varta
104 Views

चिपळूण:खेर्डी विकासवाडी रोडवरील आठवडा बाजार मैदानात उभ्या असलेल्या एका टेम्पो ट्रॅव्हलरला भरधाव इर्टिगा कारने जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, इर्टिगा चालकाच्या बेजबाबदारपणामुळे हा अपघात झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी विनोद प्रकाश डेंगडे (वय ४८, रा. अलोरे बाजारपेठ) यांचा टेम्पो ट्रॅव्हलर (क्र. MH 08 BK 0393) हा शनिवारी रात्री खेर्डी विकासवाडी येथील आठवडा बाजार मैदानात उभा होता. दरम्यान, रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास आरोपी रोहित संजय आगरे (वय ३१, रा. दिंडोशी, गोरेगाव, मुंबई) याने आपल्या ताब्यातील इर्टिगा कार (क्र. MH 47 AG 7369) अतिशय वेगात आणि रस्त्याच्या विशिष्ट परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालवली. वेगावर नियंत्रण न राहिल्याने ही कार थेट उभ्या असलेल्या टेम्पो ट्रॅव्हलरवर जाऊन धडकली. या धडकेत दोन्ही गाड्यांच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले आहे.या अपघातानंतर विनोद डेंगडे यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत चालक रोहित आगरे याच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८१ आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. हयगयीने आणि धोकादायक पद्धतीने वाहन चालवून सार्वजनिक ठिकाणी मालमत्तेचे नुकसान केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. चिपळूण पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Total Visitor Counter

3339553
Share This Article