GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी: तरवळफाटा येथे रक्ताच्या उलट्या होऊन उत्तर भारतीय वृद्धाचा मृत्यू

Gramin Varta
87 Views
One pair of Feet alone in Bed on White Sheets sleeping under a blanket, relaxion cute

रत्नागिरी: तालुक्यातील तरवळफाटा येथे राहणाऱ्या एका ५८ वर्षीय वृद्धाचा रक्ताच्या उलट्या होऊन अचानक मृत्यू झाल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली. गंगाराम गंजल लोढी (वय ५८, मूळ रा. बांसी, जि. सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश, सध्या रा. तरवळफाटा, रत्नागिरी) असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गंगाराम लोढी हे २३ मार्च रोजी मध्यरात्रीच्या सुमारास आपल्या घरी असताना त्यांना अचानक रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या. उलट्यांचा त्रास इतका तीव्र होता की ते जागीच जमिनीवर कोसळले. त्यांच्या नाक आणि तोंडातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाल्याने कुटुंबीयांनी आणि स्थानिकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी जाकादेवी येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने तेथील डॉक्टरांनी त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) हलवण्याचा सल्ला दिला.

त्यानुसार गंगाराम लोढी यांना रत्नागिरी येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना सोमवारी पहाटे १२.४५ वाजण्याच्या सुमारास मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी रुग्णालयात धाव घेत पंचनामा केला. पहाटे ३.३८ वाजता या प्रकरणाची नोंद भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) कलम १९४ अन्वये करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.

Total Visitor Counter

3375087
Share This Article