GRAMIN SEARCH BANNER

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सल्लागार समितीवर ज्योती ठाकरे

मुंबई: कोकण मराठी साहित्य परिषद या राज्यातल्या अग्रगण्य व प्रतिष्ठत साहित्य संस्थेच्या सल्लागार समितीवर शिवसेनेच्या उपनेत्या तथा महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माजी अध्यक्ष डॉ. ज्योती ठाकरे यांची निवड झाली आहे.

कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकत्याच झालेल्या केंद्रीय कार्यकारिणीच्या सभेत सर्वानुमते त्यांची निवड करण्यात आली. सदर त्रिसदस्यीय सल्लागार समितीत महाडच्या शोभा सावंत व पनवेलचे रामशेठ ठाकूर यांचाही समावेश आहे.

कोकण मराठी साहित्य परिषदेची कार्यकर्ती ते सल्लागार समिती सदस्य अशी भरारी घेणाऱया ज्योती ठाकरे यांना यापूर्वी उत्कृष्ट ग्रामीण लेखिका या पुरस्काराने गौरवले गेले आहे. त्यांनी तीन पुस्तकांचे संपादन केले असून त्यांचा ‘मध्यावर’ कवितासंग्रह प्रकाशित झाला आहे.

Total Visitor Counter

3487997
Share This Article