रत्नागिरी : जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक; आरपीएफची मोठी कारवाई

saurabhsalvi26@gmail.com
1 Min Read

रत्नागिरी : रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा दल आणि सी अँड आय विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या संयुक्त कारवाईत मद्यसाठ्याची अवैध वाहतूक करणाऱ्या दोन प्रवाशांना रंगेहाथ पकडले आहे. मडगाव ते मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या मार्गावर धावणाऱ्या जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये (गाडी क्र. १२०५२) नियमित तपासणी सुरू असताना ही कारवाई करण्यात आली. संशयित हालचालींवरून ताब्यात घेतलेल्या या दोघांकडे एकूण १९१ दारूच्या बाटल्या सापडल्या असून हा संपूर्ण साठा जप्त करण्यात आला आहे.
कोकण रेल्वेमार्गावरून होणारी अवैध तस्करी रोखण्यासाठी आरपीएफकडून सातत्याने गस्त घातली जात आहे.

याच मोहिमेअंतर्गत रत्नागिरी स्थानकावर गाडी थांबली असता, आरपीएफ आणि व्यावसायिक व सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या पथकाने संशयास्पद बॅगांची झडती घेतली. यावेळी दोन व्यक्तींकडे मोठ्या प्रमाणावर मद्याचा साठा आढळून आला. या कारवाईनंतर रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना कडक आवाहन केले आहे की, रेल्वे प्रवासादरम्यान कोणत्याही प्रकारच्या प्रतिबंधित वस्तू किंवा अमली पदार्थांची वाहतूक करू नये. रेल्वे प्रवास सुरक्षित आणि नियमानुसार व्हावा यासाठी प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींवर पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *