भोंदू खरातच्या कार्यालयात मिळाल्या महिलांच्या नावाने चेक आणि अंगठीच्या रिंगा

saurabhsalvi26@gmail.com
2 Min Read

सिन्नर मध्ये रूपाली चाकणकरांनी घेतली कार्यकर्त्यांची बैठक

नाशिक: भोंदू बाबा अशोक खरात याच्या कार्यालयाची झडती घेतली असता कार्यालयामध्ये 36 प्रकारच्या वेगवेगळ्या अंगठीच्या रिंगा सापडल्या असून काही महिलांच्या नावाने चेक देखील सापडले आहेत दरम्यान दुसरीकडे या सर्व प्रकरणांमध्ये अडकल्यामुळे राजीनामा द्यावा लागलेल्या रूपाली चाकणकर या पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचे समोर आले आहे.

नाशिक शहरातील अनेक महिलांवार दैवी शक्तीच्या नावाखाली लैंगिक अत्याचार करुन बलात्कार केल्याची घटना समोर आली होती . त्यानंतर खरातचे अनेक महिलांसोबतचे व्हिडीओ व्हायरल झाले. दरम्यान, अशोक खरातचे राजकीय कनेक्शन देखील समोर आले. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या रुपाली चाकणकर यांचे देखील खरात सोबतचे फोटो व्हायरल झाले होते. या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यासाठी म्हणून महाराष्ट्र पोलिसांच्या वतीने स्वतंत्र महिला आयपीएस अधिकारी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पोलीस तपास पथकाची म्हणजे एसआयटीची स्थापना केली आहे. एसटीच्या माध्यमातून त्याचा तपास सुरू आहे. आत्तापर्यंत सहा गुन्ह्यांमध्ये तपास पूर्ण करण्यात आला आहे. सातवा गुन्ह्यामध्ये तपास सुरू आहे.

गुन्हाचा तपास करत असताना पुन्हा एकदा विशेष पोलीस पथकाने खरात यांच्या कार्यालयाची झडती घेतली. या झडती मध्ये पुन्हा एकदा आक्षेपार या गोष्टी मिळाल्या असून यामध्ये महिलांच्या नावाने असलेले चेक मिळालेले आहेत तसेच विविध प्रकारच्या अंगठ्या बनविण्यासाठी 36 प्रकारच्या रिंगा असलेला सेट देखील मिळाला असून या सर्व गोष्टींचा वापर कशासाठी होत होता याची चौकशी आता सुरू झालेली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भोंदू बाबा खरात याच्या समोरील अडचणी वाढू लागलेल्या आहेत.

दरम्यान दुसरीकडे या सर्व प्रकरणांमध्ये अडचणीत आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या राज्य महिला अध्यक्ष आणि माझी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर या सर्वसाधारण सव्वा महिन्याच्या अंतरानंतर परत एकदा राजकारणामध्ये तसेच सामाजिक कार्यामध्ये सक्रिय झाल्याचे समोर आलेले आहे त्यांनी सिन्नर येथील नांदूर या गावी जाऊन आपल्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली, त्यांच्याशी चर्चा केली विचार विनिमय केला याबाबतचे फोटो देखील त्यांनी आपल्या सोशल मीडिया मधून व्हायरल केले आहेत त्यामुळे रूपाली चाकणकर पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचे समोर आलेले आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *