GRAMIN SEARCH BANNER

गुहागर : तळवली आगरवाडी येथे ८५ वर्षीय वृद्धेची गळफास लावून आत्महत्या

Gramin Varta
63 Views

गुहागर : तालुक्यातील तळवली आगरवाडी नंबर १ येथे एका ८५ वर्षीय वृद्ध महिलेने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून गुहागर पोलीस ठाण्यात या प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आनंदी आत्माराम मते (वय ८५, रा. तळवली आगरवाडी नं. १, ता. गुहागर) असे मृत वृद्धेचे नाव आहे. सोमवारी ४ मे २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. आनंदी मते यांनी आपल्या राहत्या घराच्या पडवीमध्ये कपडे वाळत घालण्यासाठी बांधलेल्या दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. घरातील व्यक्तींच्या हे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली.

या घटनेची माहिती मिळताच गुहागर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. ही आत्महत्या नेमकी कोणत्या कारणातून करण्यात आली, याचा अद्याप उलगडा झालेला नाही. याप्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात बीएनएसएस कलम १७६ (पूर्वीचे सी आर पी सी १७४) अंतर्गत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रात्री १९.२७ वाजण्याच्या सुमारास हा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. वाढत्या वयात अशा प्रकारे टोकाचे पाऊल उचलल्याने गावात शोककळा पसरली आहे.

Total Visitor Counter

3360765
Share This Article