बकरी ईद २८ मे रोजी होणार साजरी

Gramin Varta
1 Min Read

मुंबई:  ‘जिलकद’ या अरब अरबी महिन्याच्या २९ तारखेला रविवारी (दि. १७) शहरासह जिल्ह्यात कोठेही चंद्रदर्शन झाले नाही. त्यामुळे जिलहिज्जा या महिन्याला सोमवार (दि.१८) ऐवजी मंगळवार (दि. १९) पासून प्रारंभ करण्यात आला. त्यानुसार या महिन्याच्या दहाव्या दिवशी म्हणजे येत्या गुरुवारी, दि. २८ रोजी ‘ईद-उल-अज्हा’ अर्थात बकरी ईद साजरी करण्याचा निर्णय शहर-ए-खतीब हाफिज हिसामुद्दीन अशरफी यांनी जाहीर केला आहे.

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शहरासह विविध ठिकाणांहून बोकड विक्रीसाठी बाजारात दाखल झाले असून, खरेदीसाठी बाजारात गर्दी होत आहे. त्याग, बलिदानाची शिकवण देणारा इस्लामी संस्कृतीमधील बकरी ईदचा सण दिनदर्शिकेत बुधवारी (दि. २७) दर्शविण्यात आला आहे.

नाशिक शहरासह जिल्ह्यात व अन्य शहरांतही रविवारी चंद्रदर्शन घडल्याबाबतची ग्वाही नाशिक विभागीय चांद समितीला रात्री उशिरापर्यंत प्राप्त होऊ शकली नाही. त्यामुळे शहर-ए-खतीब हाफिज हिसामुद्दीन अशरफी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित चांद समिती व धर्मगुरूंच्या बैठकीत, चालू अरबी महिन्याचे तीस दिवस पुर्ण करून मंगळवारपासून पुढील अरबी महिन्याचा प्रारंभ होऊन, त्यानुसार ईद येत्या दि. २८ मे रोजी साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती समितीच्या अधिकृत सूत्रांकडून देण्यात आली आहे. ईदनिमित्त शहरातील ऐतिहासिक शहाजहाँनी ईदगाह मैदानात सामूहिक नमाजपठणाचा सोहळा पारंपरिक पद्धतीने पार पडणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *