मुंबई: राज्यामध्ये सध्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ विधान परिषद निवडणुकीच्या अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस असताना राज्यामध्ये राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत.
यातच कोकणात एक धक्कादायक ट्विस्ट समोर आला आहे. तो म्हणजे मविआचे उबाठाचे उमेदवार बाळ माने यांनी भाजपच्या नितेश राणेंसोबत जात परस्पर अर्ज माघारी घेतल्याने त्यांच्यावर पक्षविरोधी कारवायात सहभागी झाल्याबद्दल त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी केली.
नेमकं काय म्हणाले संजय राऊत?
याबाबत ट्विट करताना उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी लिहिलं की, बाळ माने यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवायात सहभागी झाल्या बद्दल शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही कारवाई केली आहे.







