रायपाटण पोलीस दूरक्षेत्राचे स्वतंत्र पोलीस ठाण्यात रूपांतर करण्याची मागणी; वाढत्या कामाच्या व्यापाचा संदर्भ

Gramin Varta
50 Views

राजापूर: राजापूर तालुक्यातील पूर्व भागातील कायदा आणि सुव्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने, रायपाटण पोलीस दूरक्षेत्राचे स्वतंत्र पोलीस ठाण्यात रूपांतर करावे, अशी मागणी नागरिक आणि विविध स्तरांतून जोर धरू लागली आहे. सध्या केवळ चार कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून या दूरक्षेत्राद्वारे तालुक्यातील तब्बल २८ गावांचा कारभार सांभाळला जातो, जो वाढत्या लोकसंख्येच्या आणि गुन्हेगारीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर अपुरा ठरत आहे. ओणी-अनुस्कुरा मार्गावरील वाढती वाहतूक आणि अनुस्कुरा घाटाचे धोरणात्मक महत्त्व लक्षात घेता, येथे स्वतंत्र पोलीस ठाण्याची स्थापना करणे ही काळाची गरज बनली असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

या कार्यालयासाठी पोलीस विभागाच्या मालकीची स्वतंत्र जागा उपलब्ध असून, गस्तीसाठी स्वतंत्र वाहन उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली आहे. जोपर्यंत स्वतंत्र पोलीस ठाण्याचा प्रस्ताव मंजूर होत नाही, तोपर्यंत सध्याच्या दूरक्षेत्राचे बळकटीकरण करण्यासाठी येथे अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे आणि पोलीस उपनिरीक्षक किंवा सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याची तातडीने नियुक्ती करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Total Visitors :
4827571
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *