भोस्ते घाटात चालकाच्या प्रसंगावधनाने टळला मोठा अनर्थ; अवजड क्रेनचे ब्रेक निकामी

Gramin Varta
61 Views

खेड: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील भोस्ते घाटात रविवारी, २८ जून रोजी सकाळी एका अवजड क्रेनचे ब्रेक अचानक निकामी झाल्यामुळे भीषण अपघाताची घटना घडली. गोव्याहून मुंबईच्या दिशेने निघालेली जीए-१५ एसपी-२४ क्रमांकाची ही अवजड क्रेन घाटातील तीव्र उतारावर आली असताना तिचे ब्रेक निकामी झाले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन चालकाने अत्यंत धाडसाने आणि प्रसंगावधनाने वाहनावरील नियंत्रण राखून क्रेन थेट रस्त्यावरील दुभाजकावर (डिव्हायडर) चढविली. या निर्णयामुळे समोरून येणाऱ्या वाहनांना क्रेनची धडक बसण्याचा संभाव्य मोठा धोका टळला.

सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही. या घटनेमुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती, मात्र संबंधित यंत्रणेने क्रेन बाजूला करून वाहतूक पुन्हा सुरळीत केली. चालकाच्या या धाडसी आणि वेळीच घेतलेल्या निर्णयामुळे मोठी दुर्घटना टळल्याची चर्चा घटनास्थळी उपस्थित नागरिकांमध्ये होती.

Total Visitors :
4833272
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *