रत्नागिरी : शेतकऱ्यांच्या मागणीला कृषी विभागाचा सकारात्मक प्रतिसाद देत युरियाचा संरक्षित साठा खुला करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली.
जिल्ह्यातील परिस्थिती पाहता मागील तीन वर्षांमध्ये खतांचा सरासरी वापर १२२९७ मे.टन एवढा आहे. सद्यस्थितीमध्ये मंजूर आवंटन आणि उपलब्ध खते यांची तुलना केली असता जिल्ह्यामध्ये ९० टक्के खते उपलब्ध झाली आहेत.
पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या संकल्पनेतून बांधावर खते, बियाणे, निविष्ठा वितरण मोहीम जिल्ह्यातील शेतकरी गट /समुहांकरिता कृषी विभाग, खरेदी विक्री संघ, वि. का. से. सोसायटी यांच्याद्वारा राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील एकूण १५३७ गावांपैकी ८१४ गावांमध्ये ४४९ गटांमार्फत बांधावर खते / निविष्ठा वितरण करण्यात आले असून, सामुहिक खरेदीमुळे आर्थिक बचतीसह वेळेची देखील बचत झाली आहे.
जिल्ह्यासाठी सन २०२५-२६ खरीप हंगामाकरिता (एप्रिल ते सप्टेंबर) खतांचे (युरिया, डीएपी, संयुक्त खते, एसएसपी) १२९०८ मे. टन आवंटन मंजूर आहे. त्यापैकी युरियाचे ६९८४ मे टन इतके आवंटन मंजूर आहे.
मागील तीन महिन्यांचा (एप्रिल ते जून) विचार करता जिल्ह्यामध्ये खतांच्या (युरिया, मिश्र खते, संयुक्त खते, एसएसपी) ५५२४ मे. टन आवंटनाच्या तुलनेत ११७४१ मे. टन एवढी खते उपलब्ध झाली आहेत. तसेच युरियाच्या ३०७३ मे. टन आवंटनाच्या तुलनेत ७२३७ मे. टन युरियाची उपलब्धता झाली आहे.
इथून पुढे भात पिकाकरिता व फळझाडांच्या खते भरणी करता आवश्यक असलेली आणखी खते उपलब्ध व्हावीत, यासाठी जिल्हास्तरावरून कृषी विभाग प्रयत्नशील आहे. वेळोवेळी शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करता भात पिकासाठी युरिया खताची उपलब्धता व्हावी यासाठी, जिल्ह्यातील ५०० मे. टन बफर स्टॉक मधील ४१६ मे. टन युरियाचा साठा (८३%) खुला करून देण्यात आला आहे. याचा फायदा जिल्ह्यामधील दुर्गम भागात राहणाऱ्या शेतकऱ्यांबरोबरच इतर शेतकऱ्यांना झाला आहे.
रेकद्वारे तालुकानिहाय खतांचा पुरवठा खालीलप्रमाणे करण्यात आला आहे.
चिपळूण तालुका युरिया आणि सुफला पुरवठा अनुक्रमे 1014.07 मे.टन, 162 मे.टन असा एकूण 1176.07.
दापोली तालुका युरिया आणि सुफला पुरवठा अनुक्रमे 575.55 मे.टन, 285.5 मे.टन असा एकूण 861.05.
गुहागर तालुका युरिया आणि सुफला पुरवठा अनुक्रमे 288.76 मे.टन, 301.8 मे.टन असा एकूण 590.56.
खेड तालुका युरिया आणि सुफला पुरवठा अनुक्रमे 454.14 मे.टन, 84 मे.टन असा एकूण 538.14.
लांजा तालुका युरिया आणि सुफला पुरवठा अनुक्रमे 607.24 मे.टन, 216.5 मे.टन असा एकूण 823.74.
मंडणगड तालुका युरिया आणि सुफला पुरवठा अनुक्रमे 40.5 मे.टन, 122 मे.टन असा एकूण 162.5.
राजापूर तालुका युरिया आणि सुफला पुरवठा अनुक्रमे 674.99 मे.टन, 278 मे.टन असा एकूण 952.99.
रत्नागिरी तालुका युरिया आणि सुफला पुरवठा अनुक्रमे 1162.84 मे.टन, 478.5 मे.टन असा एकूण 1641.34.
संगमेश्वर तालुका युरिया आणि सुफला पुरवठा अनुक्रमे 704.7 मे.टन, 149.5 मे.टन असा एकूण 854.2 खतांचा पुरवठा करण्यात आला आहे.