पाली : मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्यावतीने ५८व्या युवा महोत्सव दक्षिण रत्नागिरी जिल्हास्तरीय प्राथमिक फेरीत डी. जे. सामंत वरिष्ठ महाविद्यालयाचा सिद्धेश शिवगण या विद्यार्थ्याने एकपात्री (मराठी) स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळविला. या विद्यार्थ्याने ‘जत्रा’ नावाची एकपात्री प्रयोग सादर केला. या एकपात्री प्रयोगाचे लेखन व दिग्दर्शन सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक नंदकुमार जुवेकर यांनी केले होते. त्याचबरोबर त्यांचे सहकारी परवेज गोलंदाज यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.
डी. जे. सामंत वरिष्ठ विद्यालयाचा एकपात्री स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळाल्याने संस्थेचे अध्यक्ष रविंद्र सामंत, उपाध्यक्ष महेश सामंत यांनी अभिनंदन केले. महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. कांता कांबळे व सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी विद्यार्थ्यांना विविध स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी प्रवृत्त केले. डी. जे. सामंत वरिष्ठ महाविद्यालयाच्यावतीने ५८व्या मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवामध्ये विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यातून सिद्धेश शिवगण या विद्यार्थ्यांचा एकपात्री प्रयोग या स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळाल्याबद्दल त्याचे संस्थेच्यावतीने महाविद्यालयाच्यावतीने अभिनंदन करण्यात आले. पुढील विद्यापीठ स्तरीय अंतिम स्पर्धा १९ सप्टेंबर २०२५ रोजी मुंबई येथे होणार आहे. या स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी सिद्धेश शिवगण हा अधिक तयारी करीत आहे. त्यासाठी त्याला संस्थेच्या व महाविद्यालयाच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.
मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवात सामंत महाविद्यालयाचा सिद्धेश शिवगण एकपात्री स्पर्धेत तृतीय
