GRAMIN SEARCH BANNER

दापोली डम्पिंग ग्राउंडमुळे  जनावरांचे जीवन धोक्यात

Gramin Varta
119 Views

दापोली :- दापोली नगरपंचायत क्षेत्रातील काळकाई कोंड परिसरातील डम्पिंग ग्राउंडवर कचऱ्याचे व्यवस्थापन योग्य प्रकारे होत नसल्याने मोकाट गुरे मोठ्या प्रमाणात कचरा आणि त्यासोबत असलेले प्लास्टिक खात आहेत. ही बाब जनावरांच्या आरोग्यासाठी घातक असून यामुळे मुक्या प्राण्यांचा मृत्यू ओढवू शकतो.

कचऱ्यात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्या व प्लास्टिक बाटल्या इतर घातक साहित्य उघड्यावर टाकले जात आहे. खाद्याच्या शोधात आलेले ही जनावरे प्लास्टिक पिशव्यांच्या मधून खाद्य शोधताना प्लास्टिक पिशव्यांसहित हे खाद्य खात आहेत. त्यामुळे त्यांच्या जीवनावर विपरीत परिणाम घडून येत आहे. जनावराने प्लास्टिक खाल्ल्यामुळे जनावराच्या पचनसंस्थेत अडथळे निर्माण होतात. ज्यामुळे प्रसंगी त्यांचा तडफडून मृत्यू होऊ शकतो. जर ही गुरे दूध देणारी असतील, आणि दुर्दैवाने या गुरांचे दूध काढून कोणी दूध विक्री करत असेल तर प्लास्टिक मधील विषारी घटक मानवी साखळीत शिरकाव करू शकतात. डम्पिंग ग्राउंडला तत्काळ संरक्षण जाळी किंवा कुंपण घालावे, अशी मागणी होत आहे.

Total Visitor Counter

3374545
Share This Article