रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूलच्या ९ विद्यार्थ्यांचे सी. ए. फाउंडेशन परीक्षेत यश; गुणवंतांचे सर्व स्तरातून कौतुक

Gramin Varta
49 Views

खेड: इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडियातर्फे घेण्यात आलेल्या सी. ए. फाउंडेशन परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, खेड येथील रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूलच्या ९ विद्यार्थ्यांनी या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. वाणिज्य शाखेच्या कठीण मानल्या जाणाऱ्या या प्रवेश परीक्षेत शाळेच्या विद्यार्थ्यांची कामगिरी उत्कृष्ट ठरली आहे. चिराग ओडोल, श्रावणी आवटी, हित जोयसर, मानसी कापसे, स्वराज मुरुडकर, तन्वी कानडे, श्वेता लांजेकर, अमिरा चौगुले आणि उल्फत मुकादम अशी यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत.

शाळेत शिक्षण घेत असतानाच या विद्यार्थ्यांची सी. ए. फाउंडेशन परीक्षेसाठीची तयारी सुरू झाली होती. या यशात वाणिज्य विभागातील प्रा. रुपाली बोडस, प्रा. बाळासाहेब राऊत, प्रा. पारस नलावडे, प्रा. स्वप्निल पंडित आणि प्रा. अक्सा फोपळोणकर यांच्या मार्गदर्शनाचा मोठा वाटा आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल रोटरी शिक्षण संस्थेचे चेअरमन बिपीनदादा पाटणे, संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाने खेड परिसराच्या शैक्षणिक शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Total Visitors :
4833825
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *