लांजात वादळी वाऱ्याचा तडाखा; आगरवाडीत सुपारीचे झाड घरावर कोसळून नुकसान

Gramin Varta
353 Views

लांजा/अरबाज नेवरेकर:-लांजा शहरातील आगरवाडी परिसरात शुक्रवारी सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्यामुळे राजाराम तानू आगरे यांच्या घराशेजारील सुपारीचे झाड उन्मळून थेट त्यांच्या घरावर कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत घराच्या छतासह इतर भागांचे नुकसान झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

अचानक आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे सुपारीचे झाड मुळासकट उन्मळून पडले. झाड थेट घरावर कोसळल्याने घराचे मोठे नुकसान झाले. घटनेच्या वेळी घरातील सर्व सदस्य सुरक्षित ठिकाणी असल्याने मोठा अनर्थ टळला.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. झाड हटविण्यासाठी स्थानिकांनी पुढाकार घेतला. या घटनेमुळे आगरवाडी परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.दरम्यान, संबंधित महसूल प्रशासनाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून झालेल्या नुकसानीचे योग्य मूल्यांकन करावे व शासनाकडून नुकसानभरपाई तातडीने मंजूर करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *