चिपळूण: डॉ. उमेश पवार यांची आरपीआय (आठवले) पक्षाच्या कोकण प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती

Gramin Varta
37 Views

चिपळूण: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार, करबवणे गावचे सुपुत्र डॉ. उमेश पवार यांची पक्षाच्या कोकण प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीचा अधिकृत कार्यक्रम नुकताच पार पडला, ज्यामध्ये कोकण प्रदेश अध्यक्ष प्रकाश मोरे यांच्या हस्ते डॉ. उमेश पवार यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. या महत्त्वपूर्ण प्रसंगी रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रीतम रुके, कोकण प्रदेश युवक अध्यक्ष सुशांत सकपाळ, रत्नागिरी जिल्हा पर्यावरण अध्यक्ष सुरेंद्र तांबे, जिल्हा संघटक अजित तांबे, चिपळूण तालुका अध्यक्ष प्रशांत मोहिते आणि सरचिटणीस उमेश सकपाळ यांच्यासह पक्षाचे अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

डॉ. उमेश पवार यांच्या या नियुक्तीमुळे कोकण प्रदेशात रिपब्लिकन पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत होईल, तसेच पक्षाची विचारधारा तळागाळातील जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाचा मोठा फायदा होईल, असा ठाम विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला आहे. डॉ. उमेश पवार यांच्या या निवडीबद्दल रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण कोकणातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, विविध स्तरांतील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजबांधवांकडून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Total Visitors :
4566163
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *