विस्तार शिक्षण विभागामार्फत दापोली तालुक्यात हळद बियाणे वाटप

Gramin Varta
62 Views

दापोली: कृषी महाविद्यालय, दापोलीच्या कृषी विस्तार शिक्षण विभागामार्फत वेळोवेळी विविध विस्तार शिक्षण उपक्रम राबविले जातात. याच मालिकेचा एक भाग म्हणून, चालू खरीप हंगामामध्ये कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजय राणे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालय, दापोली आणि वनशास्त्र महाविद्यालयातील सिंधुरत्न योजनेअंतर्गत दत्तक खेडे किन्हळसह दापोली तालुक्यातील शेतकऱ्यांना हळद बियाण्याचे मोफत वाटप करण्यात आले.

शेतकरी वर्गाने हळद लागवडीचे क्षेत्र वाढवावे, या उद्देशाने हे बियाणे पुरविण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत किन्हळ, गिम्हवणे, उंबरले, हर्णे आणि देवके येथील सचिन महादवे, रमेश टेमकर, अविनाश मळेकर, सुरेश डायनाक, संदेश येसंवारे, प्रशांत चिपटे, रोहिणी येसंवारे, दिलीप येसंवारे, श्रीकांत रेवाळे, संजय गोरीवले, दत्ताराम आग्रे, संतोष गोरीवले व विलास गोरीवले यांसह एकूण शेतकऱ्यांना ८८ किलो हळद बियाणे वितरित करण्यात आले. विस्तार शिक्षण विभागाचे प्रमुख डॉ. संतोष वरवडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या कार्यक्रमासाठी सहाय्यक प्राध्यापक डॉ. मंदार पुरी, कनिष्ठ संशोधन सहाय्यक डॉ. प्रवीण झगडे, डॉ. शिल्पा नाईक, दृकश्राव्य चालक श्रीयश पवार, लिपिक अभिजित उमराणे, वाहन चालक प्रवीण पवार, सहाय्यक कृषी अधिकारी सौ. दर्शना वरवडेकर आणि चंद्रकांत साळवी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Total Visitors :
4576143
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *