दापोलीतील आघारी समुद्रकिनाऱ्यावर आढळला प्रौढाचा मृतदेह

Gramin Varta
139 Views

दापोली : तालुक्यातील आघारी गावच्या समुद्रकिनाऱ्यावर सुमारे ५० ते ५५ वर्षे वयोगटातील एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी दाभोळ सागरी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृताची ओळख पटविण्याचे आणि मृत्यूचे कारण शोधण्याचे काम सुरू आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, देवजी लक्ष्मण रहाटे हे शनिवारी (११ जुलै) सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास आघारी गावची ग्रामदेवता महामाई देवीच्या पूजेसाठी समुद्रकिनाऱ्यावरील खडकाळ भागातून जात होते. त्यावेळी त्यांना समुद्राच्या पाण्यावर पांढऱ्या रंगाचा शर्ट तरंगताना दिसला. संशय आल्याने त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता तेथे अंदाजे ५० ते ५५ वर्षे वयोगटातील एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला.

यानंतर त्यांनी तात्काळ माजी पोलीस पाटील चंद्रकांत कानसे यांना दूरध्वनीद्वारे माहिती दिली. त्यानंतर दाभोळ सागरी पोलिसांना घटनेची खबर देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून मृताची ओळख पटविण्यासाठी तसेच त्याच्या नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. याप्रकरणी दाभोळ सागरी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे

Total Visitors :
4575620
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *