तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत राजापूर रॉयल चेस अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचा डंका; जिल्हास्तरावर निवड

Gramin Varta
22 Views

राजापूर (प्रतिनिधी): तालुका क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित राजापूर तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धा २०२६ मध्ये येथील राजापूर रॉयल चेस अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी विविध वयोगटांत घवघवीत यश संपादन करत आपला दबदबा निर्माण केला आहे. बुद्धीबळाच्या पटावर अटीतटीच्या झालेल्या लढतींमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत या खेळाडूंनी आगामी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली आहे.

या स्पर्धेत १४ वर्षे मुलांच्या वयोगटात विश्वनाथ विद्यालय, राजापूरचा विद्यार्थी नील दिनेश कुडाळी याने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन घडवत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला, तर मयंक अमोल बोटले याने द्वितीय, चिन्मय गणेश बाकाळकर याने तृतीय आणि हेमांग प्रशांत मराठे याने चौथा क्रमांक मिळवला. १४ वर्षे मुलींच्या वयोगटात सानवी सदाशिव सरखोत हिने तृतीय आणि गाथा दीपक चव्हाण हिने चौथा क्रमांक मिळवत यश संपादन केले.

तसेच १७ वर्षे मुलांच्या वयोगटात मानवीक सुशांत मराठे याने प्रतिस्पर्ध्यांवर मात करत प्रथम क्रमांक पटकावला. १७ वर्षे मुलींच्या गटामध्ये गार्गी विजय सावंत हिने प्रथम क्रमांक, तर समृद्धी रमेश वालेकर हिने चौथा क्रमांक पटकावला.
हे सर्व यशस्वी खेळाडू राजापूर रॉयल चेस अकॅडमीमध्ये मुख्य प्रशिक्षक मोहसीन सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली बुद्धिबळाचे  प्रशिक्षण घेत आहेत. सय्यद सरांचे प्रशिक्षण आणि विद्यार्थ्यांचा सराव यांच्या जोरावरच हे यश मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे. या यशाबद्दल सर्व यशस्वी बुद्धिबळपटूंचे आणि प्रशिक्षक मोहसीन सय्यद यांचे क्रीडाप्रेमी, पालक आणि सर्वच स्तरातून कौतुक होत असून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.

Total Visitors :
4827473
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *