साखरी नाटे येथे खिदमत फाऊंडेशनच्या वतीने सातवे रक्तदान शिबिर; २२ रक्तदात्यांचे योगदान

Gramin Varta
5 Views

राजापूर : खिदमत फाऊंडेशन, साखरी नाटे यांच्या वतीने कोरोना महामारीच्या काळापासून सातत्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत असून, यंदाचे सातवे रक्तदान शिबिर उत्साहात पार पडले. या शिबिराला रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत तब्बल २२ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.

रक्तदान हे गरजू रुग्णांच्या उपचारासाठी अत्यंत महत्त्वाचे असून, समाजातील प्रत्येक घटकाने अशा उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची गरज आहे. याच सामाजिक भावनेतून खिदमत फाऊंडेशनकडून कोरोना काळापासून सातत्याने रक्तदान शिबिराचे आयोजन केले जात आहे. यंदाच्या शिबिरात २२ जणांनी रक्तदान करून मोलाचे योगदान दिले.

यावेळी साखरी नाटे जामा मस्जिदचे अध्यक्ष श्री. नदीम भाई तमके, साखरी नाटे ग्रामपंचायत समितीचे माजी सरपंच श्री. नौशाद धाळवेलकर, खिदमत फाऊंडेशन साखरी नाटेचे अध्यक्ष श्री. सिकंदर भाई हातवडकर, उपाध्यक्ष श्री. शकशील कोतवडकर तसेच तैजीब बांगी, राहील गावखडकर, फैरोझ गोवळकर, फकीर मुहंमद सोलकर आदी मान्यवर उपस्थित होते.

रक्तदान शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी खिदमत फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच उपस्थित मान्यवरांनी रक्तदात्यांचे कौतुक केले. रक्तदान करून सामाजिक कार्यात मोलाचे योगदान देणाऱ्या सर्व रक्तदात्यांचे खिदमत फाऊंडेशन, साखरी नाटे यांच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

Total Visitors :
4772395
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *