राजापूर: शेतात काम करताना महिलेच्या हाताला अज्ञात जीवाणूचा चावा; उपचारापूर्वीच मृत्यू

Gramin Varta
252 Views
Cropped shot of the feet of an unrecognizable male corpse lying on a hospital bed

राजापूर : तालुक्यातील बेनगी नागलेवाडी येथे शेतात रान काढण्याचे काम करत असताना एका ७० वर्षीय महिलेच्या उजव्या हाताला अज्ञात जीवाने चावा घेतल्याची घटना घडली. उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केले.

गंधाली गजानन नागले (वय ७०, रा. बेनगी नागलेवाडी, ता. राजापूर) या १८ ऑगस्ट रोजी घराजवळील शेतात रान काढत होत्या. यावेळी त्यांच्या उजव्या हाताला कोणीतरी चावा घेतला. चावा घेतल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडल्याने गौरव गजानन नागले यांनी त्यांना खासगी वाहनातून धारतळे येथील शासकीय दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारांसाठी रत्नागिरीतील सिव्हील हॉस्पिटलमध्ये नेण्याचा सल्ला दिला.

त्यानंतर त्यांना रत्नागिरी येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता उपचार सुरू करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेची नोंद नाटे पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, चावा नेमक्या कोणत्या जीवाने घेतला आणि त्यातूनच त्यांचा मृत्यू झाला का, याबाबत पुढील कार्यवाही सुरू आहे.

Total Visitors :
4740472
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *