पाचल : कै. ज्ञा. म. नारकर वाचनालय येथे राष्ट्रीय ग्रंथपाल दिन उत्साहात साजरा

Gramin Varta
19 Views

तुषार पाचलकर/ राजापूर : पाचल येथील कै. ज्ञा. म. नारकर वाचनालय पाचल येथे पद्मश्री डॉ. एस. आर. रंगनाथन यांचा जन्मदिन राष्ट्रीय ग्रंथपाल दिन म्हणून अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात उपस्थितांच्या स्वागताने झाली, ज्यामध्ये कार्यवाह श्री. विनायक खानविलकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. त्यानंतर वाचनालयाचे जेष्ठ सभासद व खजिनदार श्री. शिरीष सक्रे यांच्या हस्ते डॉ. रंगनाथन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली आणि अभिवादन करण्यात आले.

प्रतिमेचे पूजन झाल्यानंतर ग्रंथपाल दिनाबाबतची सविस्तर माहिती ग्रंथपाल श्री. विठोबा चव्हाण यांनी उपस्थितांना दिली. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमास कार्यवाह श्री. विनायक खानविलकर, ग्रंथपाल श्री. विठोबा चव्हाण आणि लिपिक सौ. काव्या प्रसाद सुतार यांच्यासह अनेक मान्यवर व मंडळी उपस्थित होती. राष्ट्रीय ग्रंथपाल दिनाचे औचित्य साधून वाचनालयात तब्बल पाच दिवसांच्या विशेष ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रंथ प्रदर्शनाचा लाभ परिसरातील विद्यार्थी, शिक्षक तसेच सर्व वाचकांनी घ्यावा, असे आवाहन यावेळी श्री. विनायक खानविलकर यांनी केले. ग्रंथपाल दिनानिमित्त वाचनालयाच्या सर्व विश्वस्त मंडळाकडून ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या. या संपूर्ण कार्यक्रमाच्या शेवटी सौ. काव्या सुतार यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Total Visitors :
4685149
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *