राजापूरजवळ रेल्वे रुळावर अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला; ओळख पटविण्याचे पोलिसांचे आवाहन

Gramin Varta
240 Views
Cropped shot of the feet of an unrecognizable male corpse lying on a hospital bed

राजापूर/ तुषार पाचलकर: मौजे मोसम गावातील रेल्वे बोगद्याजवळ, रेल्वे ट्रॅक क्रमांक २७१/१० ते २७१/२ दरम्यान एका अज्ञात इसमाचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आल्याची घटना उघडकीस आली आहे. १९ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मोसम तावडेवाडीचे पोलीस पाटील उदय वासुदेव तावडे यांनी या घटनेबाबत राजापूर पोलीस ठाण्याला माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. प्राथमिक अंदाजानुसार, हा इसम धावत्या रेल्वेगाडीतून खाली पडून गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला असावा, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी राजापूर पोलिसांनी अकस्मात मृत्यू नोंद क्रमांक ५२/२०२६, बीएनएसएस कलम १९४ अन्वये नोंद करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

मयत इसमाचे वय अंदाजे ५५ ते ६० वर्षे असून वर्ण सावळा आणि डोक्याचे केस काळे-पांढरे आहेत. त्याच्या अंगात गुलाबी रंगाचा प्लेन फुल शर्ट, पांढरी बनियन, कमरेस पांढऱ्या रंगाची लुंगी आणि आत चॉकलेट रंगाची AURX कंपनीची हाफ अंडरवेअर परिधान केलेली आढळली आहे. तसेच डाव्या हाताच्या मनगटात काळ्या रंगाचे स्टेनलेस स्टीलचे घड्याळ आहे. या वर्णनावरून संबंधित मयत व्यक्तीबाबत कोणालाही काही माहिती असल्यास त्यांनी पोलीस निरीक्षक अमित यादव (९२७३९२६४२०), पोलीस उपनिरीक्षक सुधीर उबाळे (७३५००२८४८२) किंवा पोलीस हेडकॉन्स्टेबल रहीम मुजावर (७२७२८६६७८६) यांच्याशी राजापूर पोलीस ठाण्यात त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Total Visitors :
4729942
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *