राजापूर तालुका युवा सेनेमार्फत जि.प. शाळा पाचल येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप

Gramin Varta
80 Views

पाचल/ तुषार पाचलकर: राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत, युवा सेना कार्यकारिणी सदस्य अपूर्वाताई सामंत, राजापूर तालुकाप्रमुख दीपक नागले, रत्नागिरी उपजिल्हाप्रमुख अशपाक हाजी, राजापूर पंचायत समिती सभापती नंदिनी कदम तसेच युवा सेना जिल्हाप्रमुख तुषार साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेना राजापूर तालुक्याच्या वतीने जिल्हा परिषद शाळा पाचल क्रमांक १ व ३ येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस चालना मिळावी आणि शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध व्हावे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला असून यादरम्यान विद्यार्थ्यांना वह्या, पेन, खाऊ तसेच इतर आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.

या कार्यक्रमा प्रसंगी युवा सेना तालुकाप्रमुख सुनील गुरव, जिल्हा परिषद सदस्या शिधाली मोरे, युवा सेना तालुका समन्वयक सुरेश ऐनारकर, पंचायत समिती सदस्या अपेक्षा मासे, महिला विभागप्रमुख श्वेता पवार, युवा सेना युवती विभागप्रमुख विद्या लांजेकर, युवा सेना विभागप्रमुख युवराज मोरे, तळवडे पंचायत समिती उपविभागप्रमुख राहुल गोसावी, जि.प. शाळा पाचल क्रमांक १ व ३ च्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा श्रद्धा जाधव, मुख्याध्यापक तसेच शिक्षिका श्रीमती शुभांगी खाशाबा सागरे, श्रीमती जयश्री रामराव राठोड, सौ. उमा अमर चिखली आणि सौ. प्रणाली घोलप यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना नियमित शिक्षण, शिस्त आणि परिश्रम यांचे महत्त्व पटवून देत उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या असून युवा सेना राजापूर तालुक्याच्या या सामाजिक व शैक्षणिक उपक्रमाचे विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांनी कौतुक करत आयोजकांचे आभार मानले.

Total Visitors :
4565619
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *