चिपळूण : सामायिक जमिनीवर बेकायदेशीररीत्या अतिक्रमण केल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा

Gramin Varta
114 Views

चिपळूण : तालुक्यातील कालुस्ते ग्रामपंचायतीसमोरील सामायिक जमिनीवर बेकायदेशीररीत्या अतिक्रमण करून कंपाऊंड भिंत, गेट आणि रस्ता उभारून जागेचा ताबा घेतल्याप्रकरणी चिपळूण पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी मुंबईतील माहीम येथे वास्तव्यास असलेले डॉ. मुस्ताक इसहाक परकार (वय ७२) यांनी तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, कालुस्ते येथील गट क्रमांक ३०७ मधील सामायिक जमिनीवर कोणताही कायदेशीर अधिकार नसताना संबंधितांनी अतिक्रमण केले.

तक्रारीनुसार, २१ एप्रिल २०२५ ते २१ जुलै २०२६ या कालावधीत अब्दुल लतीफ हसन परकार, लुकमान अमीन परकार आणि मोहम्मद सालेह अहमद परकार (सर्व रा. कालुस्ते, ता. चिपळूण) यांनी संबंधित जागेवर बेकायदेशीर कंपाऊंड भिंत, गेट उभारून त्याला कुलूप लावले. तसेच पत्र्याचा रस्ता बांधून सामायिक जमिनीचा ताबा घेतल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

ही बाब निदर्शनास आल्यानंतर डॉ. परकार यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा नोंद केला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Total Visitors :
4580989
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *