नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर एक नवा व्हिडिओ संदेश जारी करत देशातील परीक्षा प्रणाली अधिक मजबूत करण्यासाठी सरकारने उचललेल्या पावलांची माहिती दिली.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, संसदेने परीक्षा प्रणाली अधिक विश्वासार्ह आणि पारदर्शक बनवणारे महत्त्वाचे विधेयक मंजूर केले आहे.
देशात विश्वासार्ह परीक्षा पद्धती निर्माण करण्यासाठी सरकार सातत्याने एकामागून एक महत्त्वाचे निर्णय घेत आहे. टास्क फोर्सची स्थापना, फास्ट ट्रॅक यंत्रणा उभारणे आणि राज्य सरकारांच्या सूचनांचा विचार करणे अशा अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
पंतप्रधानांनी सांगितले की, गेल्या अनेक दशकांपासून देशातील जवळपास प्रत्येक राज्य आणि केंद्र सरकारला पेपरफुटीच्या समस्येला सामोरे जावे लागले आहे. या प्रकारांमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर परिणाम होत असून त्यांच्या करिअरपुढे मोठे संकट निर्माण होत आहे.
याच पार्श्वभूमीवर संपूर्ण देशातील शिक्षण आणि परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करणे आता अत्यावश्यक झाले आहे, असेही पंतप्रधान मोदी यांनी आपल्या व्हिडिओ संदेशात नमूद केले
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून रात्री नवा व्हिडिओ जारी, परीक्षा प्रणाली अन् पेपरफुटी संदर्भात दिले मोठे अपडेट
Leave a Comment





