कडवईत एस.टी. स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; १५० नागरिकांचा सहभाग

Gramin Varta
7 Views

कडवई / नियाज खान: युवासेनेच्या माध्यमातून कडवई जिल्हा परिषद गट आणि पंचक्रोशीतील महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित करण्यात आलेले एस.टी. NCMC स्मार्ट कार्ड नोंदणी शिबीर अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात आणि यशस्वीरीत्या पार पडले. १ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला असून तब्बल १५० नागरिकांनी यशस्वी नोंदणी करून या शिबिराचा लाभ घेतला.

शिवसेना जनसंपर्क कार्यालय, ओकटे कॉम्प्लेक्स, तुरळ-कडवई रोड येथे सकाळी ९.०० ते दुपारी २.०० या वेळेत हे शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात सहभागी झालेल्या सर्व लाभार्थ्यांना युवासेनेच्या वतीने भेटवस्तू देण्यात आली. नागरिकांचा हा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता, ज्या नागरिकांना या शिबिराचा लाभ घेता आला नाही, त्यांच्यासाठी लवकरच पुन्हा एकदा अशाच शिबिराचे आयोजन केले जाईल, असे आश्वासन आयोजकांकडून देण्यात आले.
या प्रसंगी युवासेना उपतालुका प्रमुख सुधीर चाळके, स्वरूप सावंत यांच्यासह परिसरातील नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी युवासेना विभाग प्रमुख संदेश फडकले, उपविभाग प्रमुख कडवई निहाल खान आणि वसंतजी उजगावकर यांनी विशेष मेहनत घेतली. युवासेनेच्या या सामाजिक उपक्रमाचे कडवई व पंचक्रोशीतील नागरिकांकडून विशेष कौतुक होत आहे.

Total Visitors :
4630053
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *