संगमेश्वर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहात शैक्षणिक साहित्याचे वितरण

Gramin Varta
9 Views

संगमेश्वर: सामाजिक चळवळीच्या माध्यमातून संगमेश्वर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय विद्यार्थी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना नुकतेच शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. मुंबई, चाळीसगाव, पुणे आणि अन्य शहरांतून संगमेश्वर येथे उच्च शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा मोठा लाभ झाला.
दरवर्षीप्रमाणे यंदाही सामाजिक कार्यकर्त्या सौ. अर्चिता कोकाटे आणि कुरधुंडा गावचे तंटामुक्ती अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते इरफान नेवरेकर यांच्या विशेष योगदानामुळे वसतिगृहातील सोळा विद्यार्थ्यांना वह्या व शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.

या कार्यक्रमास साप्ताहिक ‘पोलीस तपास’चे उपसंपादक तथा सामाजिक कार्यकर्ते दिनेश अंब्रे, स्थानिक ग्रामस्थ नितीन जाधव आणि श्रीकांत होडे आदी मान्यवर उपस्थित होते. वसतिगृहाच्या अधीक्षक सौ. अस्मिता सावंत यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.कार्यक्रमादरम्यान मार्गदर्शन करताना सौ. अर्चिता कोकाटे यांनी विद्यार्थ्यांना वसतिगृहात राहताना स्वतःची जबाबदारी ओळखण्याचे आवाहन केले. तसेच, मन लावून अभ्यास करून स्वतःचे, आई-वडिलांचे आणि वसतिगृहाचे नाव उज्ज्वल करण्याचा सल्ला देत त्यांनी समाजातील विविध प्रेरणादायी उदाहरणांच्या माध्यमातून अभ्यासाचे महत्त्व पटवून दिले.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते दिनेश अंब्रे यांनी ‘हसती दुनिया’ हे पुस्तक वसतिगृहास भेट दिले आणि त्या पुस्तकातील रंजक गोष्टींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसेच अजिंक्यराज सुर्वे आणि सागर कुचेकर यांच्यातर्फे सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी वसतिगृहाच्या अधीक्षक सौ. अस्मिता सावंत यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.

Total Visitors :
4590859
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *