लांजातील अयान घारे यांची यूकेमध्ये भरारी; वास्तुकला विषयात पदव्युत्तर पदवी संपादन

Gramin Varta
821 Views

लांजा/ अरबाज नेवरेकर : लांजा येथील उद्योजक समीर घारे यांचे चिरंजीव आणि सामाजिक कार्यकर्ते परवेझ घारे यांचे नातू अयान समीर घारे यांनी युनायटेड किंगडम (यूके) येथील कॉव्हेंट्री विद्यापीठातून वास्तुकला विषयातील पदव्युत्तर पदवी (मास्टर ऑफ आर्किटेक्चर) संपादन केली आहे.

अयान घारे यांनी आपल्या मेहनत, जिद्द आणि गुणवत्तेच्या बळावर परदेशातील उच्च शिक्षणाचे स्वप्न साकार केले आहे. यूकेमध्ये वास्तुकला विषयातील उच्च शिक्षण पूर्ण करून त्यांनी मिळविलेले हे यश घारे कुटुंबीयांसह लांजा तालुक्यासाठीही अभिमानाची बाब ठरली आहे.

लांजा येथून सुरू झालेल्या अयान  यांच्या शैक्षणिक प्रवासाने आता थेट यूकेपर्यंत मजल मारली असून, त्यांच्या या यशातून लांजा तालुक्यातील तरुणांसमोर उच्च शिक्षण आणि कर्तृत्वाची नवी प्रेरणादायी दिशा निर्माण झाली आहे.

अयान यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार आणि लांजा परिसरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, वास्तुकला क्षेत्रातील त्यांच्या पुढील उज्ज्वल वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Total Visitors :
4840896
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *