राज्य व केंद्रस्तरावर विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी
संगमेश्वर : नवनिर्मिती फाउंडेशन, उक्षी संचलित न्यू व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूल, आंबेड बुद्रुक येथील विद्यार्थ्यांनी मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा २०२६ मध्ये सलग तिसऱ्या वर्षी उल्लेखनीय यश संपादन करत विद्यालयाच्या यशाची हॅट्रिक पूर्ण केली आहे. राज्यस्तरासह केंद्रस्तरावरही विद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुण मिळवत शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेची पुन्हा एकदा साक्ष दिली आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण इंग्रजी माध्यमाचे शिक्षण देण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या न्यू व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूलने शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मंथन परीक्षेतील यश हे विद्यार्थ्यांच्या परिश्रमाबरोबरच शिक्षकांच्या नियोजनबद्ध मार्गदर्शनाचे आणि पालकांच्या सहकार्याचे फलित असल्याचे विद्यालय व्यवस्थापनाने सांगितले.
विद्यार्थ्यांना नियमित अभ्यासासोबत सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, तर्कशक्ती आणि स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक कौशल्ये विकसित करण्यासाठी शाळेत विशेष उपक्रम राबविण्यात आले. वेळोवेळी सराव परीक्षा, प्रश्नसंच सोडविणे, वैयक्तिक मार्गदर्शन आणि शंकानिरसन सत्रे यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला आणि त्याचा परिणाम या यशस्वी कामगिरीत दिसून आला.
राज्यस्तरावर आणि केंद्रस्तरावर मानाचे स्थान मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचे विद्यालयात विशेष कौतुक करण्यात आले. या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही स्पर्धा परीक्षांकडे प्रेरणा मिळाली असून भविष्यात आणखी मोठे यश संपादन करण्याचा विश्वास शिक्षकांनी व्यक्त केला.
या उल्लेखनीय यशाबद्दल विद्यार्थ्यांचे, त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे, मुख्याध्यापकांचे तसेच विद्यालयाच्या व्यवस्थापनाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. नवनिर्मिती फाउंडेशनच्या माध्यमातून ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता, स्पर्धात्मकता आणि आत्मविश्वास निर्माण करण्याचे कार्य सातत्याने सुरू असून त्याचेच हे यशस्वी फलित असल्याची भावना पालकांनी व्यक्त केली.
यामध्ये राज्यस्तरावर मध्ये आलेले विद्यार्थी तैमूर मेहराज आंबेडकर,रय्यान बिलाल आंबेडकर,तानिया मेहराज आंबेडकर, रायन रमजान गोलंदाज,संजन्या सुभाष मुळ्ये,स्मित दिलीप सनगरे,पूर्वी संजय मांजरेकर,दामिनी रमेश मेस्त्री,सत्यजीत गणेश भोसले यांचा समावेश आहे.
आणि केंद्रस्तरावर इम्रान हवालदार,श्राव्या प्रथमेश वेल्ये,अलिना अतिक बोट,नुझहत अश्फर हफसानी,अल्तमश अल्ताफ कपडे,सबा शोएब अलजी,आराध्या समिंदर नागवेकर,मुशफिरा रईस अलजी,समिरा अल्ताफ कपडे,सारा जुनेद खान,आयू रुपेश लिंगायत,मिहीर दिपक गोनबारे,अफ्रा अशफाक आंबेडकर,अकीया अझीम आंबेडकर, स्नेहराज राजेंद्र घाणेकर,अथर्व भारत माटल, नवमान अझहर जामभरकर, आफिया हारून आंबेडकर,,गार्गी अंकुश जाधव,मर्झिया नुरुद्दीन केळकर, रिदा रिझवान केळकर,विराज सुभाष मुळ्ये,अंश सुहास साळसकर. या विद्यार्थ्यांनी चांगले घवघवीत यश संपादन केले आहे.
मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षेतील या दमदार कामगिरीमुळे न्यू व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूलने पुन्हा एकदा आपल्या शैक्षणिक उत्कृष्टतेचा ठसा उमटविला असून राज्यस्तरावर विद्यालयाचे नाव अभिमानाने झळकविले आहे. यावेळी संस्थेचे अध्यक्ष रमजान गोलंदाज यांनी सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.





