देवरुख : कर्ली येथील विषारी औषध प्राशन केलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

Gramin Varta
187 Views
Cropped shot of the feet of an unrecognizable male corpse lying on a hospital bed

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील कर्ली-रावंगणवाडी येथील २३ वर्षीय तरुणाचा विषारी औषध प्राशन केल्यानंतर उपचार सुरू असताना कोल्हापूर येथील सी.पी.आर. रुग्णालयात मृत्यू झाला. आशिष दिपक रावंगण (वय २३, रा. कर्ली, रावंगणवाडी, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आशिष रावंगण याने २७ ऑगस्ट रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास आपल्या राहत्या घराच्या गोठ्यात विषारी औषध प्राशन केले होते. त्यानंतर त्याला उपचारासाठी रत्नागिरी येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी २८ ऑगस्ट रोजी १०८ रुग्णवाहिकेने त्याला कोल्हापूर येथील सी.पी.आर. रुग्णालयात हलविण्यात आले.

सी.पी.आर. रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू असतानाच ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद देवरुख पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ३५/२०२६, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बी.एन.एस.एस.) कलम १९४ अन्वये करण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील कार्यवाही सुरू आहे.

Total Visitors :
4825607
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *