८० व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून देवरुखमध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

Gramin Varta
16 Views

देवरुख: देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त स्वातंत्र्य सैनिक आणि भारतीय सैनिकांना रक्तदान करून अनोखी मानवंदना देण्यासाठी देवरुख येथे एका विशेष रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. परिसरातील रक्ताची टंचाई लक्षात घेऊन ‘देवरुखकर सदैव एक पाऊल पुढे’ या संकल्पनेतून हा स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला असून, रक्तपेढी – शासकीय रुग्णालय रत्नागिरी, ICTC विभाग – ग्रामीण रुग्णालय देवरुख, विलास होडे प्रबोधिनी आणि जिज्ञासा प्रबोधिनी – साडवली यांच्या संयुक्त विद्यमाने हे रक्तदान शिबिर पार पडणार आहे.

शनिवार दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत ग्रामीण रुग्णालय देवरुख येथील पहिल्या मजल्यावरील हॉल क्र. १५ मध्ये हे शिबिर संपन्न होईल. राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्याच्या उद्देशाने या शिबिरात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी युयुत्सु आर्ते (९४२२३५१९२६), वैभव बुर्शे (८३२९८१३६४३) आणि पुजारी मॅडम (८२६१८६४७४१) यांच्याशी संपर्क साधता येईल.

Total Visitors :
4638785
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *