मंडणगड : येथील महाराष्ट्रा्रीय यादव चॅरिटी ट्रस्ट सभागृहात भारतीय जनता पार्टी उत्तर रत्नागिरी जिल्हा कार्यकारणीची महत्त्वाची बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीत पक्षाच्या आगामी संघटनात्मक कामकाजाचा आढावा घेत उपस्थितांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले.
बैठकीच्या सुरुवातीला राजकीय व सामाजिक विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. या बैठकीमध्ये भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे मा.नगराध्यक्ष ॲड.वैभव खेडेकर आणि भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांनी सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांशी मनमोकळा संवाद साधत आगामी वाटचालीबाबत मार्गदर्शन केले. स्थानिक पातळीवर पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी बूथ स्तरावर प्रभावी काम करण्याचे आवाहन नेत्यांनी यावेळी केले.
या महत्त्वपूर्ण बैठकीस भाजपा रत्नागिरी जिल्हा महामंत्री तथा गुहागर पंचायत समितीचे उपसभापती निलेश सुर्वे, भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस अक्षय फाटक, भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस वसंत ताम्हणकर, भाजपा युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हाध्यक्ष संकल्प अवेरे, भाजपा अल्पसंख्याक सेल रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा खेड नगर परिषदेचे नगरसेवक गटनेते रहीम सहिबोल, अजय दळवी, भाजपा युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस ॲड.मिलिंद उर्फ दादू नांदगांवकर, भाजपा युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस प्रसाद मांडवकर, भाजपा दापोली महिला मोर्चा तालुकाध्यक्षा जयाताई साळवी, भाजपा दक्षिण खेड तालुकाध्यक्ष विनोद चाळके, शशांक सिनकर, भाजपा सोशल मीडिया दापोली तालुका संयोजक धिरज पटेल, भाजपा खेड तालुका सरचिटणीस शुभम गायकवाड, भाजपा युवा मोर्चा खेड शहराध्यक्ष स्वराज गांधी, प्रदीप भोसले, ओवैस चौगुले आणि भाजपा सोशल मीडिया खेड शहर प्रमुख सर्वेश पवार यांच्यासह उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील विविध भागांतून आलेले प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीच्या शेवटी उपस्थितांनी आगामी काळात पक्ष संघटना अधिक तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प केला.




