आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेत सेक्रेड हार्ट कॉन्व्हेन्ट हायस्कूलचे यश

Gramin Varta
80 Views

रत्नागिरी नगरपालिकेकडून यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव

रत्नागिरी : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट हायस्कूल (रत्नागिरी शहर) येथे आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांचा रत्नागिरी नगरपालिकेकडून गौरव करण्यात आला.
या स्पर्धेत परिसरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या स्पर्धेत सेक्रेड हार्ट कॉन्व्हेन्ट हायस्कूलच्या इयत्ता नववी ‘अ’ मधील ऐशानी अलंकार विचारे हिने प्रथम, तर आयशा ताहिर मुल्ला हिने द्वितीय क्रमांक पटकावला.

त्याचप्रमाणे शालेय स्तरावर वक्तृत्व स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत अनेक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन विविध विषयांवर आपले विचार प्रभावीपणे मांडले. विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व कौशल्याला, आत्मविश्वासाला आणि विचार मांडण्याच्या क्षमतेला या स्पर्धेमुळे उत्तम वाव मिळाला.

हा कार्यक्रम मुख्याध्यापिका सिस्टर जॉयलेट परेरा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सर्व शिक्षकांच्या सहकार्याने यशस्वीरीत्या पार पडला. कार्यक्रमाच्या शेवटी विजेत्यांचा गौरव करण्यात आला तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना भविष्यातही अशा स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले.

दरम्यान, रत्नागिरी नगरपालिकेतर्फे आयोजित गुणगौरव सोहळ्यात स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांचा गौरव करण्यात आला. यावेळी नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे, उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर, नगरसेविका मेधा कुलकर्णी, नगरसेवक राजीव कीर, आरोग्य सभापती बंटी कीर, नगरसेविका प्रीती सुर्वे आदी मान्यवर उपस्थित होते.

- Advertisement -
Total Visitors :
4660457
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *