तुषार पाचलकर/राजापूर: राजापूर लांजा तालुका नागरिक संघ व श्री मनोहर हरी खापणे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत अनुस्कुरा घाट व पांडवकालीन ऐतिहासिक उगवाई मंदिर परिसरात उद्या 27 जुलै रोजी वृक्षारोपण केले जाणार आहे. अनुस्कुरा घाटात वड, पिंपळ, आंबा, काजू अशा भारतीय संस्कृतीतील महत्त्वपूर्ण असणाऱ्या, दीर्घायुषी वृक्षांची व फळझाडांची व उगवाई मंदिर परिसरात फुलझाडांची लागवड केली जाणार आहे. या उपक्रमात जागतिक कीर्तीचे चित्रकार विजयराज बावधनकर, राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचे अध्यक्ष श्री सुभाष लाड,श्री. गणेश चव्हाण, वृक्षमित्र श्री.अमर खामकर, तळवडेच्या सरपंच सौ.गायत्री साळवी, पर्यटन अभ्यासक श्री.विजय हटकर, प्रसिद्ध कवी श्री.विराज चव्हाण, श्री.दीपक आयरे, पत्रकार श्री.उमेश दळवी, श्री.जयेश दळवी, संजय कानसे, आदर्श शिक्षक दीपक नागवेकर, सुनील कदम, येरडव सरपंच सौ. विद्या बामणे,श्री. गणेश सुतार, श्री. राजू पत्की, पाचलचे माजी उपसरपंच श्री. किशोर नारकर, श्री. चंद्रहास नारकर, खापणे महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. विकास पाटील, स्वयंसेवक विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित रहाणार आहेत.
नुकतीच युनिस्को मार्फत चौदा किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळावर मान्यता मिळाली. याचा मनस्वी आनंद आहेच. शासनाने आता या ऐतिहासिक सातवाहन कालीन पायवाटेची दुरुस्ती करावी याकडे लक्ष वेधण्यासाठी यापुढील काळात प्रयत्न करूया असे राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचे अध्यक्ष श्री.सुभाष लाड यांनी यावेळी बोलताना सांगितले. या वृक्षारोपण कार्यक्रमात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.