दापोली: एसटीच्या चाकाखाली सापडून महिला जखमी

Gramin Varta
97 Views

दापोली : बसस्थानकात शनिवारी सायंकाळी एसटी बसच्या धडकेत महिला बसच्या चाकाखाली आल्याची घटना घडली. चालकाने प्रसंगवधान राखून बस थांबविल्याने मोठा अनर्थ टळला. या अपघातात महिलेच्या डोक्याला व पायाला दुखापत झाली असून उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले.

लक्ष्मी दत्ताराम मेंगे (वय ५८, रा. जालगाव, ता. दापोली) असे जखमी महिलेचे नाव आहे. शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास लक्ष्मी मेंगे या एका एसटी बसमधून उतरून बसस्थानकाच्या आधारातून बाहेर जात होत्या. त्याचवेळी दापोली स्थानकातून ठाण्याच्या दिशेने जाण्यासाठी एसटी बस मार्गस्थ होत होती. बस पुढे जात असताना मेंगे यांना बसचा धक्का लागल्याने त्या खाली पडल्या आणि बसच्या चाकाखाली आल्या. ही घटना लक्षात येताच बसस्थानकातील प्रवाशांनी आरडाओरड करून चालकाचे लक्ष वेधले.

चालकाने तत्काळ बस थांबविल्याने पुढील अनर्थ टळला. या घटन्यानंतर काही काळ दापोली बसस्थानकात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. बसस्थानकात दररोज मोठ्या संख्येने प्रवाशांची ये-जा असते. बस ये-जा करत असताना प्रवाशांची सुरक्षितता, बसचालकांकडून घेतली जाणारी खबरदारी तसेच बसस्थानकातील वाहतूक नियोजनाचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा ऐरणीवर आला आहे.

- Advertisement -
Total Visitors :
4674056
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *