दापोली-करजगाव मार्गावर एसटी बस आणि रिक्षाची धडक

Gramin Varta
116 Views

दापोली : दापोली आगाराच्या बसची आणि एका रिक्षाची चंद्रनगर फाटा येथे बुधवारी (दि. १२ ऑगस्ट) दुपारी टक्कर झाल्याची घटना घडली. या अपघातात दोन्ही वाहनांचे काही प्रमाणात नुकसान झाले असले, तरी कोणालाही दुखापत झालेली नाही.

दापोली आगाराची एमएच १४ एनई ५२३२ क्रमांकाची बस दापोली ते करजगाव मार्गावरून जात होती. दुपारी पौनेएक वाजण्याच्या सुमारास चंद्रनगर फाटा ते चंद्रनगर चिंच झाड परिसराजवळ ही बस आली असता, त्याच दरम्यान एमएच ०८ एओ ८४९० क्रमांकाच्या टीव्हीएस रिक्षाने बसच्या उजव्या बाजूला धडक दिली.

या दुर्घटनेमध्ये एसटी बसच्या समोरील उजव्या बाजूचे सुमारे पाच हजार रुपयांचे नुकसान झाले असून, रिक्षाचेही सुमारे दोन हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच संबंधित विभागाने या प्रकरणाची पाहणी केली असून, प्राथमिक अहवालानुसार या अपघातासाठी रिक्षाचालक जबाबदार असल्याचे समोर आले आहे.
संबंधित बसवर चालक म्हणून नितीन भानुदास व्हावळे आणि वाहक म्हणून गणेश दिगंबर आकरे कार्यरत होते. सुदैवाने अपघाताच्या वेळी बसमधील कोणताही प्रवासी तसेच बसचे चालक, वाहक आणि रिक्षाचालक यांना कोणतीही दुखापत झालेली नाही, ज्यामुळे एक मोठी दुर्घटना टळली आहे.

- Advertisement -
Total Visitors :
4693489
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *