GRAMIN SEARCH BANNER

खेडमध्ये हातात सळी घेऊन मारहाणीच्या उद्देशाने फिरणारा संशयित ताब्यात

खेड : शहरातील इंद्रप्रस्थ हॉटेल ते जासबाईक रिपेरिंग सेंटरदरम्यान हातात लोखंडी सळी घेऊन मारहाणीच्या उद्देशाने फिरणाऱ्या एका संशयिताला गस्त घालणाऱ्या पोलिसांनी ताब्यात घेतले. हरी रामशब्द लाल (वय 38, रा. उत्तर प्रदेश) असे त्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून 24 इंच लांबीची लोखंडी सळी पोलिसांनी जप्त केली आहे.

सदर संशयित रात्रीच्या वेळी हातात लोखंडी सळी घेऊन संशयास्पदरीत्या फिरत होता. गस्त घालणाऱ्या पोलिसांनी त्याला हटकले असता तो अंधाराचा फायदा घेत एका दुकानाजवळ लपला. मात्र, पोलिसांनी त्याला शोधून काढत ताब्यात घेतले.

या घटनेबाबत पोलीस कॉन्स्टेबल अनिल पवार यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Total Visitor Counter

2455622
Share This Article