मकरंद सुर्वे /संगमेश्वर
संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथे संगमेश्वर तालुका भाजप च्या वतीने हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते . या रॅलीत संगमेश्वर तालुका भाजप चे पदाधिकारी , तसेच भाईशा घोसाळकर हायस्कुल व महाराष्ट्र उर्दू हायस्कुल कडवई चे विध्यार्थी तसेच भाजप कार्यकर्ते व ग्रामस्थ सहभागी झाले होते.
भारत सरकारच्या हरघर तिरंगा मोहिमेअंतर्गत सध्या देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे . कडवई मध्येही भारतीय जनतापार्टीच्या वतीने तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते . कडवई ग्रामपंचायत कार्यालय ते कडवई बाजारपेठ अशी रॅली काढण्यात आली . रॅलीमध्ये भाईशा घोसाळकर ज्युनियर कॉलेज , महाराष्ट्र उर्दू हायस्कुल व काळसेकर कॉलेज चे विध्यार्थी , भाजपचे संगमेश्वर तालुका पदाधिकारी ,कार्यकर्ते व ग्रामस्थ सहभागी झाले होते .रॅलीमध्ये द्वानिक्षेपकावर देशभक्तीपर गीते लावण्यात आली होती . व देशभक्तीपर घोषणा देण्यात आल्या.
कडवई बाजारपेठ येथे दि इंग्लिश स्कुल कडवई चे प्राचार्य प्रांजल मोहिते यांनी संबोधित केले . यावेळी कडवई चे उपसरपंच दत्ताराम ओकटे ,भाजप तालुकाध्यक्ष विनोद म्हस्के,चिटणीस अमित ताठरे , प्रसाद भिडे ,विधानसभा क्षेत्रप्रमुख अविनाश गुरव ,कडवई पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे सदानंद ब्रीद ,भाईशा घोसाळकर हायस्कुल चे पर्यव्यक्षक संतोष साळुंखे , व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र बोथरे आदी मान्यवर उपस्थित होते.
भारत सरकारच्या हरघर तिरंगा मोहिमेअंतर्गत सध्या देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे . कडवई मध्येही भारतीय जनतापार्टीच्या वतीने तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते . कडवई ग्रामपंचायत कार्यालय ते कडवई बाजारपेठ अशी रॅली काढण्यात आली . रॅलीमध्ये भाईशा घोसाळकर ज्युनियर कॉलेज , महाराष्ट्र उर्दू हायस्कुल व काळसेकर कॉलेज चे विध्यार्थी , भाजपचे संगमेश्वर तालुका पदाधिकारी ,कार्यकर्ते व ग्रामस्थ सहभागी झाले होते .रॅलीमध्ये ध्वनिक्षेपकावर देशभक्तीपर गीते लावण्यात आली होती . व देशभक्तीपर घोषणा देण्यात आल्या.
कडवई बाजारपेठ येथे दि इंग्लिश स्कुल कडवई चे प्राचार्य प्रांजल मोहिते यांनी संबोधित केले . यावेळी कडवई चे उपसरपंच दत्ताराम ओकटे ,भाजप तालुकाध्यक्ष विनोद म्हस्के,चिटणीस अमित ताठरे , प्रसाद भिडे ,विधानसभा क्षेत्रप्रमुख अविनाश गुरव ,कडवई पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे सदानंद ब्रीद ,भाईशा घोसाळकर हायस्कुल चे पर्यव्यक्षक संतोष साळुंखे , व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र बोथरे आदी मान्यवर उपस्थित होते .