पैशाच्या जोरावर दुर्वास पाटीलची परिसरात दहशत, एस. टी चालकावरही रोखली होती बंदूक
सांगलीतून अटक केलेल्या नीलेश रमेश भिंगार्डेलाही 8 सप्टेंबर पर्यंत पोलिस कोठडी
रत्नागिरी : सिरियल किलर दुर्वास पाटील याच्या खुनाचे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. त्याच्या या खुनशी वृत्तीमुळे परिसरात त्याची दहशत होती. 3 खून करूनही त्याने एका एस. टी चालकावर बंदूक रोखल्याची चर्चा आता परिसरात रंगत आहे.
दुर्वास याने प्रेयसी भक्ती मयेकर हिच्या खुनाअगोदर बारमधील दोन कामगारांचा खून केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.यापैकी राकेश अशोक जंगम (28, ऱा वाटद खंडाळा, रत्नागिरी) याचा कारमध्येच गळा आवळून त्याचा मृतदेह अन्य साथीदारांच्या मदतीने आंबा घाटात फेकून दिला. तर दुर्वासने केलेल्या जबर मारहाणीत सीताराम वीर (50, ऱा कळझोंडी, रत्नागिरी) याचा मृत्यू झाल्याची आणखी एक बाब पोलीस तपासात उघड झाली आहे.
दरम्यान, राकेश याच्या खूनप्रकरणी दुर्वास याचा साथीदार असलेल्या नीलेश रमेश भिंगार्डे (35, ऱा इस्लामपूर जि. सांगली) याला पोलिसांनी सांगली येथून अटक केल़ी. सोमवारी त्याला न्यायालयापुढे हजर केले असता 8 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आह़े.
सांगली येथून नीलेश भिंगार्डेला अटक
राकेश जंगम याच्या खूनप्रकरणी जयगड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांकडून तिसरा आरोपी नीलेश याचा शोध घेण्यास सुरुवात केल़ी. नीलेश हा सांगली येथे असल्याचे निष्पन्न झाल़े, त्यानुसार 31 ऑगस्ट 2025 रोजी जयगड पोलिसांचे पथक सांगली येथे रवाना झाल़े. यावेळी हनुमाननगर वॉर्ड नंबर 6, इस्लामपूर त़ा वळवा जि. सांगली येथील राहत्या घरातून नीलेश याला पोलिसांनी ताब्यात घेतल़े.
आंबा घाटात शोधमोहीमेत 200 पोलीस
6 जून 2024 रोजी राकेश जंगमचा मृतदेह दुर्वास व त्याच्या साथीदारांनी आंबा घाटातून फेकून दिला होत़ा. या घटनेला आता वर्ष उलटले असले तरी पोलिसांकडून मृतदेहांचे अवशेष मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आह़े. सोमवारी 200 हून अधिक पोलिसांच्या मदतीने आंबा घाटात मृतदेहबाबत काही मिळते का याचा शोध पोलिसांकडून घेण्यात आल़ा. मात्र पोलिसांच्या हाती काही लागले नाह़ी.
पोलीस अधीक्षकांनी बेपत्तांची यादी मागवली
दुर्वास याने एकूण तीन खून केल्याचे उघड झाल्यानंतर पोलीसदेखील चक्रावून गेले आहेत़ याप्रकरणाची गंभीर दखल जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी घेतली आह़े. जयगड पोलीस ठाण्याच्या हद्दीमधून बेपत्ता झालेल्यांची यादी मागवली आह़े. अन्य व्यक्तींच्या बेपत्ता होण्यामागे दुर्वास व त्याच्या साथीदारांचा सहभाग आहे का? याबाबत पोलिसांकडून तपासणी केली जाणार आह़े.
मृतदेहाच्या अवशेषांसाठी शर्थीचे प्रयत्न – महामुनी
राकेश जंगम याचा मृतदेह 6 जून 2024 रोजीआंबा घाटातून खाली फेकून देण्यात आला होत़ा आता या प्रकाराला वर्ष उलटून गेले असले तरी पोलिसांकडून याप्रकरणी मृतदेहाचे अवशेष मिळविण्यासाठी कसून शोध घेतला जात आह़े. आंबा घाटाचा परिसर जंगलमय असल्याने याठिकाणी असलेले वन्य प्राणी, घाटात रस्त्याचे सुरू असलेले काम यामुळे अवशेष मिळविणे अवघड ठरत आह़े तरीदेखील पोलिसांकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत़, असे अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी सांगितले.
बस वाहकावर बंदूक रोखल्याची चर्चा
दुर्वास याचा खंडाळा बाजारपेठेत सायली बार असून त्याच्याकडे मोठ्या प्रमाणावर पैसा आला होत़ा. या जोरावर तो आपल्या साथीदारांच्या मदतीने खंडाळा परिसरात दमदाटी व दहशत माजवत होत़ा. काही दिवसांपूर्वी दुर्वासने एसटी बसवाहकाशी झालेल्या वादातून बस वाहकावर बंदूक रोखल्याची चर्चा परिसरात होत़ी. मात्र याप्रकरणी कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाह़ी.
राकेश जंगमचा सांगाडा शोधण्यासाठी 200 पोलिसांची टीम आंबा घाटात, जयगडमधील बेपत्तांची पोलिस अधीक्षकांनी यादी मागवली
