GRAMIN SEARCH BANNER

खोपोलीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा अवमान; आंदोलनाचा इशारा

Gramin Search
23 Views

रायगड :  महाराष्ट्राच्या अस्मितेचा मानबिंदू सर्वसामान्य जनतेचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा खोपोलीतील एका पडीक आणि दुर्गंधीयुक्त गोदामातून पडलेली असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे.

या गंभीर प्रकरणामुळे संपूर्ण खोपोली शहरात संतापाची लाट उसळली आहे. या गोदामात जुनी गोबर गॅस युनिटची उपकरणे, खराब वीज मीटर बॉक्स, निकामी साहित्याचा डिग आणि बाहेर फिरते शौचालय ठेवण्यात आले आहे.

याच गोदामात थेट छत्रपतींची जुनी प्रतिमा कोळ्याच्या जाळ्यात बेवारस पडून असल्याचे आढळले आहे. विशेष म्हणजे ही जागा खोपोली नगर परिषदेच्या अग्निशमन केंद्राच्या इथे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अवमान कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही, असा थेट इशारा संभाजी ब्रिगेड संघटनेचे कोकण प्रदेश अध्यक्ष अंकुश हडप यांनी दिला आहे. त्यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत प्रशासनाला जाब विचारला आहे. हे महाराजांचे केवळ प्रतिमा नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या अस्मितेचा स्वाभिमानाचा आणि शौर्याचा प्रतीक आहे. असे पवित्र स्मारक धुळीत, घाणीत आणि बेवारस फेकणे हा थेट जनतेच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न आहे.

प्रशासनाने तात्काळ या प्रतिमेला सन्मानाने उचलून नवा साज चढवून योग्य ठिकाणी प्रतिष्ठापित करावे. अन्यथा संभाजी ब्रिगेड संघटना च्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडले जाईल. असा थेट इशाराही त्यांनी दिला. खोपोली परिसरात काही महिन्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांची नवीन प्रतिमा बसवण्यात आली होती परंतु जुनी प्रतिमा कोणत्या स्थितीत आहे तिला कोणत्या प्रकारे सन्मानाने ठेवले आहे.

याकडे प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही. या उदासीनतेमुळेच आता असा प्रकार उघडकीस आला आहे छत्रपती शिवाजी महाराजांची अशी दुर्दशा आमच्या सहनशक्तीच्या पलीकडे आहे प्रशासनाने आम्हाला आणि आमच्या देवतुल्य राजांना कला आहे अशी संत प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी दिली. यामुळे खोपोलीत सामाजिक संघटना व सामान्य नागरिकांत अस्वस्थता निर्माण झाली आहे.

या प्रकरणामुळे खोपोली नगरपरिषद आणि स्थानिक प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे जर या प्रकारे प्रशासनाने तातडीने लक्ष दिले नाही तर आम्ही प्रकरण आंदोलन करू असा स्पष्ट इशाराही अंकुश अडक यांनी दिला आहे. या वेळेस संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष विजय भाऊ रसाळ हेही उपस्थित होते.

Total Visitor Counter

3250866
Share This Article