चर्मालय चौकात मोटारसायकल अडवून तरुणाच्या डोक्यात कड्याने मारहाण

Gramin Varta
250 Views

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील चर्मालय चार रस्ता येथे मोटारसायकल अडवून तरुणाच्या डोक्यात हातातील कड्याने मारहाण करून शिवीगाळ केल्याची घटना ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात रोहन संजय धोत्रे (वय २३) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आकाश चंद्रकांत खेत्री (वय २४, व्यवसाय मजुरी, रा. क्रांतीनगर झोपडपट्टी, रत्नागिरी) हे चर्मालय चार रस्ता येथून मोटारसायकलवरून जात असताना आरोपी रोहन धोत्रे याने त्यांची मोटारसायकल अडवली. त्यानंतर हातातील कड्याने खेत्री यांच्या डोक्यात मारून त्यांना दुखापत केली. तसेच त्यांना अश्लील शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या घटनेनंतर आकाश खेत्री यांनी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार ३ सप्टेंबर रोजी रात्री १०.५१ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), १२६(२) व ३५२ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास रत्नागिरी शहर पोलिस करीत आहेत.

Total Visitors :
4802710
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *