भाट्ये टेबल पॉईंट येथे गांजा सदृश्य अंमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या दोघांवर गुन्हा

Gramin Varta
390 Views

रत्नागिरी : शहरातील भाट्ये टेबल पॉईंट परिसरात गांजा सदृश्य अंमली पदार्थाचे सेवन केल्याच्या आरोपावरून दोन तरुणांविरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी, दि. १ सप्टेंबर रोजी रात्री करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे ८.३५ वाजता भाट्ये टेबल पॉईंट येथील आई हॉटेलच्या बाजूला एका दगडाच्या आडोशाला दोन तरुण गांजा सदृश्य अंमली पदार्थाचे सेवन करीत असल्याचे आढळून आले. याप्रकरणी साहिल शफिक मुजावर (वय २२, रा. भाट्ये, दर्गा बस स्टॉप, रत्नागिरी) आणि सिध्देश संतोष पावसकर (वय २४, रा. भाट्ये, खोतवाडी, रत्नागिरी) यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली.

याप्रकरणी पोलीस हवालदार शांताराम रामचंद्र झोरे यांनी फिर्याद दिली असून रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३१६/२०२६ नोंद करण्यात आला आहे. एनडीपीएस कायदा १९८५ मधील कलम ८(अ), २७ आणि २९ अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दि. १ सप्टेंबर रोजी रात्री ११.३३ वाजता दाखल करण्यात आला असून पुढील तपास रत्नागिरी शहर पोलीस करीत आहेत.

Total Visitors :
4796786
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *