गुहागर : अडुर-पिंपळवाडी येथे प्रौढाची गळफास घेऊन आत्महत्या

Gramin Varta
107 Views

गुहागर : तालुक्यातील अडुर येथे ५७ वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी (दि. १ सप्टेंबर) सकाळी उघडकीस आली. या घटनेची नोंद गुहागर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद मनोहर नार्वेकर (वय ५७, रा. अडुर-पिंपळवाडी, ता. गुहागर, जि. रत्नागिरी) हे अडुर येथील स्मशानभूमीच्या शेडला असलेल्या लोखंडी अँगलला नायलॉनच्या दोरीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.

घटनेची माहिती मिळताच संबंधितांनी पोलिसांना कळविले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. याप्रकरणी रत्नाकर भालचंद्र नार्वेकर यांनी खबर दिली असून, गुहागर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ३५/२०२६ अन्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे.

या घटनेची नोंद १ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजून ४२ मिनिटांनी करण्यात आली असून, पुढील तपास गुहागर पोलीस करीत आहेत.

Total Visitors :
4797028
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *