कुटगिरी येथे लोखंडी साकव कोसळून बैलाचा मृत्यू; नुकसानग्रस्त शेतकऱ्याला 18 तासांच्या आत शासकीय मदत सुपूर्द

Gramin Varta
166 Views

रत्नागिरी :  मौजे कुटगिरी येथील भैरी शंकर मंदिरानजीक तिजग नदीवरील लोखंडी साकव काल सायंकाळी कोसळल्याने आठ जनावरे त्यामध्ये अडकली होती. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने सर्व आठ जनावरांना बाहेर काढण्यात यश आले. आठ जनावरांपैकी दिलीप नारायण लिंगायत यांच्या मालकीचा एक बैल मृत झाला तर उर्वरीत जनावरे किरकोळ जखमी झाली.

पशुवैद्यकीय विभागाने तातडीने जखमींवर उपचार व मृत बैलाचे शवविच्छेदन पूर्ण केले. मृत बैलाच्या अनुषंगाने शेतकरी श्री लिंगायत यांना रक्कम रुपये 32 हजार रुपये शासकीय आर्थिक सहाय्य धनादेश आज सकाळी 11:30 वाजता उपविभागीय अधिकारी आकाश लिगाडे, तहसीलदार गुहागर परिक्षीत पाटील, मंडळ अधिकारी पाटपन्हाळे अनिल राठोड व ग्राम महसूल अधिकारी यांच्या उपस्थितीत सुपूर्द करण्यात आला.प्रांताधिकारी यांनी जखमी जनावरांवर आवश्यक उपचार कायम ठेवण्याच्या सूचना पशुवैद्यकीय विभागाला केल्या.

Total Visitors :
4633578
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *