जानवळे येथील शाळांमध्ये मनसे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांच्या वतीने वह्यांचे वाटप; उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक

Gramin Varta
14 Views

गुहागर: जानवळे गावातील जिल्हा परिषद शाळा क्रमांक १, २ आणि ३ मधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. विनोद जानवळकर हे गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने गावकऱ्यांच्या अडीअडचणींना धावून जात असून, गरीब व गरजू नागरिकांना विविध उपक्रमांच्या माध्यमातून मदत करत असतात. या शैक्षणिक उपक्रमाबद्दल ग्रामस्थ, पालक आणि शिक्षकांनी त्यांचे विशेष आभार मानत कौतुक केले आहे. या कार्यक्रमाला जानवळे ग्रामपंचायत उपसरपंच वैभवी जानवळकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, विविध शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षक उपस्थित होते. तसेच यावेळी मनसेचे तालुका व शहर पदाधिकारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शैक्षणिक क्षेत्रात करत असलेल्या या योगदानामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होत असून, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हा उपक्रम यशस्वीपणे पार पडल्याने शाळा व्यवस्थापन समित्यांनी विनोद जानवळकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. आगामी काळातही अशाच प्रकारे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सहकार्य करावे, अशी विनंती शाळा प्रशासनातर्फे करण्यात आली.

Total Visitors :
4576141
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *