तीर्था लाड यांच्यावर चिपळूण युवती सेनेची जबाबदारी

Gramin Varta
13 Views

आमदार भास्करराव जाधव यांच्या हस्ते सत्कार; जनतेच्या प्रश्नांसाठी लढण्याचे आवाहन

चिपळूण : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या चिपळूण तालुका युवती अधिकारीपदी सौ. तीर्था मंदार लाड यांची नियुक्ती करण्यात आली. याबद्दल शिवसेना नेते तथा आमदार भास्करराव जाधव यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी आमदार जाधव यांनी तीर्था लाड यांचे अभिनंदन करून “तुमच्यावर सोपविलेली जबाबदारी ही जनतेशी जोडलेली आहे. प्रामाणिकपणे चांगले काम करा आणि जनतेच्या प्रश्नांसाठी लढा,” असे मार्गदर्शन केले.

यावेळी नवनियुक्त उपतालुका युवती अधिकारी श्रीया खेडेकर यांचेही अभिनंदन करण्यात आले. युवती सेनेच्या माध्यमातून महिला व युवतींचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासोबतच संघटना मजबूत करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

कार्यक्रमाला चिपळूण तालुकाप्रमुख सुभाष जाधव, सचिन चोरगे, प्रीतम वंजारे, पार्थ जागुष्टे, मानसी भोसले, मिथिलेश नरळकर यांच्यासह शिवसेना, युवासेना व युवती सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच लाड व दळी परिवारातील सदस्य उपस्थित होते.

Total Visitors :
4685148
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *