चिपळूण : शहरातील गुहागर बायपासजवळील ताजा भाजी मार्केट परिसरात, लाइफ केअर रस्ता येथे काल रात्री बिबट्या दिसल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सर्वांना विशेष दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अजिंक्य पेट्रोल पंप, चिपळूणचे संचालक सुरेश पवार यांनी या घटनेची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, रात्रीच्या वेळी एकटे फिरणे टाळावे तसेच अनावश्यक प्रवास टाळावा.
दरम्यान, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी संबंधित प्रशासन आणि वन विभागाला घटनेची माहिती देण्यात आली असून परिसरात सतर्कता वाढवण्यात आली आहे.
चिपळूण : गुहागर बायपासजवळ बिबट्याच्या वावराने नागरिकांत भीती
